आदर्श' सेवेला सलाम! आदर्श कन्या शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका उषा कराडे निवृत्त
आदर्श' सेवेला सलाम! आदर्श कन्या शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका उषा कराडे निवृत्त
नागपूर : कामठी रोड येथील आदर्श कन्या शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती उषा व्ही. कराडे यांना त्यांच्या प्रदीर्घ आणि समर्पित सेवेनंतर सन्मानाने निरोप देण्यात आला. त्यांच्या निवृत्तीनिमित्त शाळेतर्फे एका भावूक निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष रूपक जांभुळकर, सहसचिव सांध्य जांभुळकर, उपाध्यक्ष कुमुदिनी खोब्रागडे, नागसेन विद्यालयाचे मुख्याध्यापक अनिल टेभुर्णे ,आदर्श नागसेन प्रायमरी शाळेचे मुख्यध्यापक सुमेध फुलझले, मुख्याध्यापिका लीना टेंभेकर, मुख्याध्यापिका हर्षा पाटील उपस्थित होत्या.
श्रीमती उषा कराडे यांनी आदर्श कन्या शाळेत अनेक वर्षे अध्यापनाचे कार्य केले. आपल्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांनी हजारो विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले आणि त्यांच्यावर उत्तम संस्कार केले. विद्यार्थी, पालक आणि सहकाऱ्यांमध्ये त्या नेहमीच त्यांच्या प्रेमळ आणि कर्तव्यनिष्ठ स्वभावासाठी ओळखल्या जात होत्या असे शिक्षक राजेश राठोड यांनी सांगिलते.
मुख्याध्यापिका यांनी श्रीमती कराडे यांच्या शाळेतील योगदानाचे आणि शिस्तप्रियतेचे कौतुक केले. विशेषतः, त्यांच्या निश्चित वेळेवर काम पूर्ण करण्याच्या सवयीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. शिक्षकांनी त्यांच्यासोबतच्या सुसंवादाच्या आठवणी जागवल्या. विद्यार्थ्यांनी त्यांच्या लाडक्या 'उषा मॅडम' बद्दलच्या भावूक भावना व्यक्त करत पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. श्रीमती कराडे यांनी आपल्या मनोगतात आदर्श कन्या शाळेतील सेवा हा आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम काळ होता, असे नमूद केले. कार्यक्रमाच्या शेवटी त्यांना शाळेतर्फे भेटवस्तू देऊन पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमाचे संचालन प्रशांत बसोडे यांनी केले. आयोजित निवृत्ती समारंभात शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षकवृंद, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Salute to Adarsh' service! Senior teacher of Adarsh Kanya School Usha Karade retires
Nagpur: Senior teacher of Adarsh Kanya School on Kamathi Road, Mrs. Usha V. Karade, was bid farewell with honor after her long and dedicated service. On the occasion of her retirement, an emotional farewell ceremony was organized by the school. The program was attended by the organization's President Rupak Jambhulkar, Joint Secretary Sandhya Jambhulkar, Vice President Kumudini Khobragade, Headmaster of Nagasen Vidyalaya Anil Tebhurne, Headmaster of Adarsh Nagsen Primary School Sumedh Phuljale, Headmistress Leena Tembhekar, Headmistress Harsha Patil. Mrs. Usha Karade taught at Adarsh Kanya School for many years. Throughout her career, she guided thousands of students and instilled good values in them. Teacher Rajesh Rathod said that she was always known for her loving and dutiful nature among students, parents and colleagues. The Principal appreciated Mrs. Karade's contribution to the school and discipline. In particular, she expressed gratitude for her habit of completing work on time. The teachers recalled the memories of their harmonious interactions with her. The students expressed their heartfelt feelings for their beloved 'Usha Madam' and wished her well for the future. Mrs. Karade said in her heart that serving in Adarsh Kanya School was the best time of her life. At the end of the program, she was presented with gifts by the school and wished her well for the future. The program was conducted by Prashant Basode. The school principal, faculty, staff and students were present in large numbers in the retirement ceremony organized.
No comments